¡Sorpréndeme!

Pune Koyta Gang: कोयता गँगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराला बेड्या; १०५ कोयते जप्त | Pune News | Sakal

2023-01-10 1 Dailymotion

पुणे शहरात कोयत्याची दहशत दाखवून उच्छाद मांडणाऱ्या तरुणांचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताहेत. अशातच आतापर्यंत अनेक घटनांमध्ये पोलिसांनी तरुणांना बेड्या ठोकल्यात. पण आता पोलिसांनी थेट या कोयता गँगला कोयते पुरवणाऱ्या एका दुकानदाराला अटक केली आहे आणि त्याच्याकडून एक-दोन नव्हे तर तब्बल १०५ कोयते जप्त केलेत.